एकलव्य माध्यमिक शाळा

एकलव्य माध्यमिक शाळा

1992 साली यमगरवाडी, तुळजापूर येथे एकलव्य विद्यार्थी विकास वसतिगृह सुरू झाले. 1996 मध्ये प्राथमिक आश्रमशाळा सुरू झाली आणि 2002 मध्ये पहिली सातवीची तुकडी उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना इतरत्र पाठवण्यात आले, पण अडचणी आल्यामुळे प्रतिष्ठानने स्वतःची माध्यमिक शाळा सुरू केली. 2005 पासून माध्यमिक आश्रमशाळा सुरू झाली आणि विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक आणि अभ्यासात उल्लेखनीय यश मिळवले. 2006 मध्ये पहिली दहावीची तुकडी उत्तीर्ण झाली आणि गुणवत्तावाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे दहावीचा निकाल सातत्याने 100% लागतो. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे शाळेची जागा अपुरी पडू लागली. सलग 10 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष अधिकारातून शाळेस शासकीय मान्यता मिळाली. आजपर्यंत शाळेतून अनेक विद्यार्थी इंजिनिअर, शिक्षक, डॉक्टर व नर्स झाले आहेत. विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा शिक्षकवृंध
अ.क्र. / Sr.No. नाव / Name पद / Position
1 श्री. आण्णासाहेब रोहिदास कोल्हटकर मुख्याध्यापक
2 श्री. आण्णासाहेब बाबुराव मगर सहशिक्षक
3 श्री. संतोष रावसाहेब बनसोडे सहशिक्षक
4 श्री. बालाजी शाहु क्षिरसागर सहशिक्षक
5 श्रीम. निर्मलाताई चंद्रकांत हुग्गे सहशिक्षिका
6 श्री. भिम कल्लापा कुंभार लिपीक
7 श्री. यशवंत मनोहर निंबाळकर प्रयोगशाळा सहाय्यक
8 श्रीम. संगिता वैजिनाथ पाचंगे अधिक्षिका
9 श्री. दत्ता मुकुंद भोजने शिपाई
10 श्री. कोंडिबा किसन देवकर शिपाई
11 श्री. खंडु अधिकराव काळे शिपाई
12 श्रीम. सुनिता गेमा जाधव स्वयंपाकी
13 श्रीम. लक्ष्मी बब्रुवान पवार मदतणीस
14 श्री. शालीवाहन मोहन वाघमोडे कामाठी