भारतीय समाज हा सुमारे प्रमुख 400 जाती आणि 5000 हजार उपजातीनी तयार झाला आहे. समाजाची जडणघडण होण्यासाठी कामाची विभागणी झाली. या कर्मविभागणीचेच पुढे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले. विविध जातींमध्ये विभागलेला हा समाज “हिंदू” या धर्माच्या छत्रछायेखाली प्राचीन काळापासून एकत्र नांदतो आहे. काळाच्या ओघात या समाजव्यवस्थेला वैगुण्याची कीड लागली. जातीतून अस्पृश्यता जन्माला आली. व्यवसाय, सामाजिक व्यवहार यांच्याऐवजी जात जन्मानुसार ठरू लागली. बहुसंख्य समाज या अस्पृश्यतेच्या, विषमतेच्या रोगाचा बळी ठरला.
याच समाजात असणारा एक घटक म्हणजे भटके व विमुक्त होय. 48 प्रमुख व 200 उपजातींत विखुरलेला हा समाज कायमचा समाजव्यवस्थेबाहेर फेकला गेला. आधी येथील समाजव्यवस्थेने आणि नंतर परकीय आक्रमकांनी या भटके-विमुक्तांना देशोधडीला लावले. सांगायला गाव नाही, राहायला घर नाही, अशी दैन्यावस्था या समाजावर आली. मुळात हा भटके-विमुक्त समाज म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.
आपल्या देशाला प्राचीन काळापासून एक समृध्द वारसा लाभला आहे. आपला देश अनेक क्षेत्रांत अग्रस्थानावर होता. जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश होता. अजिंठा व वेरूळची लेणी, अशोकस्तंभ ही त्यांची काही उदाहरणे होत. एका चिरंतन संस्कृतीचा वारसा आपल्या समाजाला लाभला आहे आणि या संस्कृतिकचे वाहक होते आज ज्यांना भटके-विमुक्त म्हटले जाते ते समाजबांधव.
भारतीय समाज हा सुमारे प्रमुख 400 जाती आणि 5000 हजार उपजातीनी तयार झाला आहे. समाजाची जडणघडण होण्यासाठी कामाची विभागणी झाली. या कर्मविभागणीचेच पुढे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले. विविध जातींमध्ये विभागलेला हा समाज “हिंदू” या धर्माच्या छत्रछायेखाली प्राचीन काळापासून एकत्र नांदतो आहे. काळाच्या ओघात या समाजव्यवस्थेला वैगुण्याची कीड लागली. जातीतून अस्पृश्यता जन्माला आली. व्यवसाय, सामाजिक व्यवहार यांच्याऐवजी जात जन्मानुसार ठरू लागली. बहुसंख्य समाज या अस्पृश्यतेच्या, विषमतेच्या रोगाचा बळी ठरला.
याच समाजात असणारा एक घटक म्हणजे भटके व विमुक्त होय. 48 प्रमुख व 200 उपजातींत विखुरलेला हा समाज कायमचा समाजव्यवस्थेबाहेर फेकला गेला. आधी येथील समाजव्यवस्थेने आणि नंतर परकीय आक्रमकांनी या भटके-विमुक्तांना देशोधडीला लावले. सांगायला गाव नाही, राहायला घर नाही, अशी दैन्यावस्था या समाजावर आली. मुळात हा भटके व विमुक्त समाज म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.
आपल्या देशाला प्राचीन काळापासून एक समृध्द वारसा लाभला आहे. आपला देश अनेक क्षेत्रांत अग्रस्थानावर होता. जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश होता. अजिंठा व वेरूळची लेणी, अशोकस्तंभ ही त्यांची काही उदाहरणे होत. एका चिरंतन संस्कृतीचा वारसा आपल्या समाजाला लाभला आहे आणि या संस्कृतिकचे वाहक होते आज ज्यांना भटके व विमुक्त म्हटले जाते ते समाजबांधव.
मुळात लढवय्ये वीर असणारे हे बांधव आपल्या परंपरागत व्यवसायातून संस्कृतिचे वहन करीत असत. या समाजबांधवांमध्ये भिल्ल, पारधी, वैदू, वडार, बहुरूपी, वासुदेव, नाथजोगी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, मेंडगी-जोशी, सरोदे, शिकलकार, धनगर, कोल्हाटी, बंजारा इत्यादी प्रमुख समाजघटक होते. छत्रपतींच्या स्वराज्यात हे सर्व समाजबांधव समाजाच्या मुख्य प्रवाहाशी नाळ बांधून आपला उदरनिर्वाह करीत असत. बहिर्जी नाईकांसारखा वीरपुरूष याच समाजातून स्वराज्याला प्राप्त झाला. बारा बलुतेदारांबरोबर पसाभर धान्य शेतकरी या समाजबांधवांच्या झोळीत आनंदाने घालत.
इंग्रजांचा अंमल सुरू झाला. 1857 च्या स्वातंत्र्यसमरानंतर मराठा सत्तेचा अस्त झाला आणि भारतावर इंग्रजांची सर्वंकष सत्ता आली. पण त्यांना ही सत्ता सुखासुखी भोगता येत नव्हती. कधी उमाजी नाईकांचे बंड, तर कधी तंटया भिल्लाचे बंड से प्रसंग वारंवार घडत होते. वासुदेव बळवंत फडक्यांनी उभ्या केलेल्या सैन्यात या भटके व विमुक्त समाजबांधवांचे योगदान मोठे होते. भारतभर ठिकठिकाणी भटके-विमुक्त बांधव इंग्रजांशी लढून त्यांना जेरीस आणत होते. याचा बंदोबस्त करण्यासाठी 1881 साली इंग्रजांनी “जन्मजात गुन्हेगारी” चा कायदा केला. “सेटलमेंट” चा कायदा करून अनेक भटके-विमुक्तांना तुरूंगात डांबले. या जाचक कायदयापासून वाचण्यासाठी सुरू झाली भटकंती. आज येथे तर उदया तिथे. स्वातंत्र्याच्या पहाटेनंतरही त्यांची ही परवड कायम राहिली. या समाजाचा एक अविभाज्य घटक असूनही भटका समाज परका ठरला. घृणित जीवन जगू लागला. शौर्याचा वारसा लाभलेला हा सारा समाज पोटातील आगीपुढे हतबल झाला. भटके जीवन नशीबी आले. रानोमाळ... वनाजंगलातून लपून राहायचे, पोलीस, कायदा यापासून स्वत:चा बचाव करायचा, पण पोटाचे काय? पोटाच आग शांत कशी होणारं ? या बांधवाकडे एकच उपाय होता... चोरी ...
उपजीविकेसाठी चोरीसारख्या घृणित गोष्टीचा आसरा घ्यावा लागला. हे त्या बांधवांचे दुर्भाग्यच! पण चोरीचा कायमचा आणि जन्मजात शिक्का त्यांच्यावर बसला. हे साऱ्याच समाजाचे दुर्वर्तन होते. स्वांतंत्र्यानंतरही त्याच हीनदीन, वंचित अवस्थेत जीवन कंठण्याची मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर जवळजवळ दहा वर्षाचा काळ जावा लागला. यातून मुक्त होवून सन्मानाचे जीवन जगण्याचे भाग्य काही या बांधवांच्या नशिबी आले नाही.
सततच्या भटकंतीमुळे यापैकी अनेकांची कोठेही शासकीय पातळीवर नोंद नाही. जनगणनेत, मतदान यादीत स्थान नाही.जातीचे प्रमाणपत्र नाही. 80 टक्क्यांपेक्षा अधिक निरक्षर आहेत. भटके व विमुक्तांना घटनात्मक संरक्षण नाही. काही राज्यात त्याचा “एस.सी.” मध्ये तर काही ठिकाणी “एस.टी.” मध्ये समावेश् आहे. केंद्र शासनाच्या सूचीत भटके-विमुक्तांचा समावेश ”ओ.बी.सी.” मध्ये केला आहे. काही जमातींचा कशातच समावेश नाही. लोक देतील ते अन्न, भिकेतून मिळेल ते वस्त्र आणि चार बांबूचे पाल हीच यांची “मालमत्ता” “जी गावाची हागणदारी तीच यांची वतनदारी”.
स्वातंत्र्यांनंतर या समाजापर्यंत ज्ञानगंगेचे चार थेंब पोहोचले नाहीत. आरोग्याच्या सुविध काय असतात यांचे त्यांना ज्ञान नाही. यांची उपचारपध्दती आदिम काळापासून चालत आलेली. लोखंड गरम करून डाग देण्याची. कसरती, मनोरंजन, कारागिरी यांच्या सहाय्याने जीवनाचे रहाटगाडगे चालविणारे हे बांधव कायम उपेक्षित राहिले. वंचित राहिले. शासनाने विकासाच्या घोषणा केल्या, आयोग नेमले, पण सारेच कागदावर राहिले. भटके-विमुक्तांच्या नशिबी आला फक्त पोलिसी ससेमिरा आणि स्वत:चा, परिवाराचा बचाव करण्यासाठी जिवाच्या आकांताने केलेला भटकेपणा... गुन्हेगारीचा शिक्का भाळी मिरवत...गुन्हेगार ठरवून दगडाने ठेचून मारण्याचे प्रकार आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडले आहेत. न केलेल्या गुन्हांची कबुली देण्यासाठी कितीतरी पारधी महिलांचा अमानुष छळ झाला आहे. ही साऱ्या आयुष्याची परवड आणि गळूसारखा चिकटलेला गुन्हेगाराचा शिक्का.